
कमला : आमची रॉकस्टार
संयोगिता ढमढेरे
१२ मार्च २०२२
सध्या पाकिस्तानमध्ये असलेल्या पंजाबमधल्या खेड्यात १९४६ साली जन्मलेल्या कमला भसीन; स्वातंत्र्योत्तर भारतात पंजाबमध्ये १९६५ साली जन्मलेल्या शबनम वीरमाणी आणि आसामच्या लखीमपूर जिल्ह्यात १९७६ साली जन्मलेल्या मोसमी परीयाल म्हणजेच आताच्या पार्वती बाउल. वय, अंतर व भाषा पाहता या तिघींचा एकमेकींशी संपर्क होण्याच्या शक्यताही कमी होती. तिथे या तिघी एकमेकींच्या घट्ट मैत्रिणी झाल्या. गाणं हा या तिघींना जोडणारा …